अमळनेर पत्रकार संघाची इमारत कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही!

हे योगाभवन की पत्रकार संघाचे कार्यालय? यावर देखील प्रश्नचिन्ह!!!
शासन, आजी-माजी लोकसेवक व देणगीदारांनी तालुक्यातील समस्त पत्रकारांची सोय म्हणून दिलेली वास्तू वादाच्या भोवऱ्यात आहे! 
हे पत्रकार बांधवांना सोय म्हणून दिलेले नप अर्थात शासन मार्फत मिळालेल्या जागेत आमदार निधीतून उभे झालेले एक सार्वजनिक कार्यालय आहे,यास संत प्रसाद महाराज यांचेसह अनेक उदार देणगीदारांनी आर्थिक मदत केली आहे. 
पत्रकार संघ की योगा भवन? अशी शंका असलेल्या या वास्तूवर कुणीही वैयक्तिक हक्क सांगून आपल्या मालकीचीच इमारत आहे असे सांगण्याचे कारण नाही, 
संत प्रसाद महाराज, दिवंगत उदयबापू वाघ, कृषीभुषण साहेबरावदादा, मा मंत्री आ. अनिलदादा, मा.आ. शिरिषदादा चौधरी, खा. स्मिताताई वाघ, डॉ बि एस पाटील, अनेक देणगीदार सर्वच नगराध्यक्ष यांचे सहकार्य, पाठपुरावा व तालुक्यातील सर्व जुन्या जाणत्या पत्रकार बांधवांच्या रेट्याने ही वास्तु उभी राहिली आहे. 
मी पाणी टाकले म्हणून एखादे झाड माझ्या बापाचे होत नाही हे मालकी दाखविणाऱ्या लोकांनी समजून घेत ही वास्तू समस्त पत्रकार बांधवांचे वापरास खुली करावी.
दिवंगत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेश ललवाणी यांनी या संकल्पनेस पूर्णरुप देण्याचा प्रयत्न केला होता ही बिशेष आठवण.
या वास्तूवर काही लोक हक्क सांगत असले तरी प्रशासनाने व देणगीदार तसेच आजी माजी आमदार, नगराध्यक्ष यांनी कान उघाडणी करावी, गट तट चालणार नाहीत म्हणून सर्व समावेशक कार्यकारिणी व्हावी! किमान न प चे नियंत्रण असावे.
ग्रामीण भागातील असो की शहरातील, कोणत्याही पत्रकार संघटना सदस्य वा पदाधिकारी असो सर्वांना या वास्तूवर समान अधिकार आहे!
भाग 2 उद्या....!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments