कुणी घर बदलले!
कुणी बाप बदलला,
कुणी आप बदलला!!
कुणी पक्ष बनवले
कुणी पंखच छाटले!
कुणी घर बनवले
कुणी घरच फोडले!!
सारी नैसर्गिक किमया...
सध्या,
शिशिर ऋतू आहे...
कुणी रंग बदलणार,
कुणाचे देठ ढिले होणार..
कुणी हीरवळीतही हवेच्या झोकात निखळणार...
पण,
पानगळ होणार हे नक्की!!
याचा सोपा अर्थ...
वसंत फुलणार आहे!
नवी पालवी फुटेल...
कितीदा तेच ते?
निसर्ग बरोबर अद्दल घडवतो,
नको ते टाकतो, अन नव्याला जन्म घालतो...
थोडी प्रतीक्षा करावी लागेल इतकेच!
सूर्योदय अटळ आहे!!!!!
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
अमळनेर
7972881440



0 Comments