चक्क खासदारांचे गावात गेली 25 वर्ष ठणठणाट..?

आवर्तनावर जगतोय वाघांचा मतदार संघ!
अमळनेर तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई जाणवत असून लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत...पांझरा काठावरील गावात तर भीषण टंचाई आहे. 
यात खासदार स्मिताताई वाघ यांचे डांगर हे गाव वर्षोनूवर्षं तहानलेले आहे.. त्यांनी याच मतदार संघातून अनेकदा जी. प. सदस्य पद मिळविले, थेट जी. प. अध्यक्षा होऊन अमळनेर तालुक्यात पहिल्या वेळी लालदिवा दिसला, त्या नंतर त्या आमदार झाल्या, आणि आता थेट खासदार देखील झाल्या.. अशा अनेकदा जीप पदाधिकारी, आमदार, खासदार राहूनही स्वतःचे गावच त्या जलयुक्त करू शकल्या नाहीत.. शोकांतिका आहे,  अशी बोचकी टीका पंचक्रोशीतील जनता करीत आहे.. 
आवर्तन येईल, पाईपलाईन जुनी झाली आहे, प्रस्ताव पाठविला आहे अशी उत्तरे ताईसाहेब नेहमी देत असतात. तेच उत्तर त्यांनी या वेळी देखील दिले आहे. 
आम्ही लोकसभा निवडणुकी पूर्वीच 'डांगर गाव व परिसर तहानलेला' या कडे लक्ष वेधले होते.. ते आजही खरे ठरत आहे.. 
ताई साहेब,  किती वर्षे तुम्ही आपल्याच गाव व मतदार संघावर अन्याय करणार? आता तर खूप मोठे पद मिळाले आहे.. जी प अध्यक्ष असतानाच किमान स्वतःचे गाव तरी टँकर मुक्त केले असते! त्या नंतर आमदार देखील झालात तरी घरीच पाणी नाही?
केवळ प्रस्ताव पाठवले, पाठपुरावा सुरू आहे असे न सांगता करा ना तडका फडकी आदेश... वापरा सत्तेची पावर... किती दिवस घरच्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लावणार? 
जे तुमच्या साठी उन्ह, पाऊस, थंडी न पाहता  मतदार पायपीट करतात त्यांना तहानलेले ठेवणार? 
ताई उत्तर द्या!! असा सवाल आता डांगर गावातील नागरिक करू लागले आहेत.. आमचे कडे त्यांनी व्यथा मांडली.. आपण उत्तर द्यायला हवे.
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440 

Post a Comment

0 Comments