शिरीषदादांचा अभिष्टचिंतन सोहळा भावी अधिकारी होऊ इच्छित युवकांना पुस्तक वाटप करून संपन्न!

 सर्व समाजातील जनतेचा उदंड  प्रतिसाद
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मा. शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी इंदुमाई निवास, स्टेशन रोड येथे साजरा करण्यात आला. 
या निमित्ताने स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना किंमती पुस्तकांचा संच देण्यात आला. 
सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा अभिष्टचिंतन सोहळा रात्री उशिरापर्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला.
कल्पक, अभ्यासू व तडफदार नेतृत्वाला लाभलेला जनतेचा पाठिंबा असे या सोहळ्याचे वर्णन करावे लागेल.
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि परिसरातील सर्व धर्म व जातीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या जनतेने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपले नाते दृढ केले.
शिरीषदादांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की, "हे प्रेमच मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा देतं. माझं राजकारण हे जनतेसाठी, जनतेबरोबर आहे."
वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं. कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्याच लाडक्या नेत्याची भेट घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments