अमळनेर बस स्थानकावर पिण्याचे पाणी नाही!

शहरात देखील ठिकठिकाणी पाणपोईची गरज!
प्रवाशांचे हाल आगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष! 
कडक उन्हामुळे प्रवासी कासावीस होत असताना पाण्याची सोय करता येऊ नये याची लाज वाटली पाहिजे. 
अमळनेर बस स्टँडवर पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशी, शिक्षक, विद्यार्थी यांना वणवण भटकावे लागत आहे. विशेषता वृद्ध व विदयार्थ्यांचे खूप हाल होत आहे. परिसरातील व्यावसायिक वस्तू घेतल्या शिवाय पाणी देत नाहीत मग नाईलाजाने 20 रुपये देवुन पाणी बॉटल घ्यावी लागते, महामंडळाने तात्काळ सोय करावी.  कुणी संस्था वा दानशूर व्यक्तीने देखील पाणपोई लावावी अशी अपेक्षा. 
शहरात देखील ठिकठिकाणी संस्था व दानशूर लोकांनी पाणपोई सुरू कराव्यात असे नम्र आवाहन.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments