दानशूर लोक व सामाजिक संघटनांनी जनतेची तहान भागवावी!

वर्दळ असलेल्या ठिकाणी पाणपोई सुरू व्हाव्यात ही अपेक्षा जनता करीत आहे.
सर्वत्र उन्हाचा तडाखा बसत असून प्यायला पाणी मिळत नाही, अनेक व्यावसायिक वस्तू घेतल्या शिवाय पाणी देत नाहीत, सामान्य लोकांना 20 रुपये देऊन पाणी बॉटल घेणे परवडत नाही,
तहानलेल्या लोकांचा जीव कासावीस होत असताना कुणाला दया येत नाही, पूर्वी रोटरी, लायन्स सह अनेक संस्था जागोजागी पाणपोई लावायच्या.. निवडणूक तोंडावर असली की इच्छुक हवशे नवशे गवशे देखील असा उपक्रम राबवून फोटो मिरवायचे!
फोटो साठी म्हणा की मिरवायचे म्हणा पण त्यांचे कडून चांगले काम घडायचे...
खरे तर नगरपालिका वा शासकीय यंत्रणेची ही जबाबदारी आहे, अलीकडे ते देखील काही करीत नाहीत... संस्था वा दानशूर लोकांचे या जीव दायी उपक्रमाकडे दुर्लक्ष झाले आहे..
अमळनेर सह जिल्हाभर उन्हाचा तडाखा वाढत असताना तहान भागवायला कुणी पुढे येईल का?
असा सवाल जनता करीत आहे.
प्रशासनास विनंती की, तुम्ही करू शकत नसाल तजविज तर किमान सर्व हॉटेल व्यावसायिक वा अन्य सर्वाना सक्ती करा की आपल्या कडे प्यायचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणी नाकारले तर दंडात्मक कारवाई करता येईल का? या बद्दल देखील विचार व्हावा.
जनतेच्या वतीने नम्र आवाहन.
लोकहो, पशु पक्षीना देखील ठेवा परिसरात पाणी. कुणास पाणी मिळत नसेल तर शेवटी आपल्याला मेल्यावर पाणी द्यावे लागते, ते काही कामाचे नसते, जिवंत आहात तो पर्यंत लोकांना व पशु पक्षी यांना पाणी पाजा.. नक्की समाधान मिळेल!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

Post a Comment

0 Comments