अमळनेर शहरात पहिली पाणपोई सुरू!

संजूबाबा यांचे स्मरणार्थ सालाबादा प्रमाणे सलग 11 वे वर्ष!! 
हॉटेल संजय व चौधरी परिवार दिवंगत संजय चौधरी यांचे पुण्यस्मरण म्हणून पाणपोई लावतात. वर्दळ असलेल्या व बस स्थानका समोर कुणी पाणी देत नसताना येथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. 
रोज शेकडो लोक जल पान करून आशीर्वाद देतात. 
संजय प्रल्हाद चौधरी तथा संजू बाबाची आठवण जागे ठेवणारा त्यांचा मुलगा पवन व शालक नंदलाल चौधरी यांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. 
या पाणपोई आरंभ प्रसंगी लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, अनिल एकनाथ चौधरी, नंदलाल चौधरी, शशिकांत आढावे,  पवन चौधरी व अन्य उपस्थित होते. 
सामाजिक देणे लागतो म्हणून जलपान देण्याची परंपरा जपणाऱ्या संजय हॉटेल व चौधरी परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments