थोर स्वातंत्र्य सेनानी लीलाताई उत्तमराव पाटील यांचे आठवणीस मिळाला उजाळा!!
सामील झालेल्या अमळनेरकर परिवर्तनवादी लोकांचे अभिनंदन व आभार!!!
दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार संविधानाचे जनक तथा भारत देशाच्या जडणघडणीचे जननायक यांना अभिवादन केल्यानंतर डोळ्यासमोरून स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष डोळ्यापुढून पुढे जात होता त्यातही मोलाचे योगदान म्हणजे खानदेशातील अनेक स्वातंत्र्य सेनानी या स्वातंत्र्य सेनानींच्या अग्रभागी असलेल्या लीलाताई उत्तमराव पाटील यांना मानवंदना म्हणून अमळनेर
नगरपालिकेने ढेकू रोड परिसरात अत्यंत सुंदर असे लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाची निर्मिती केली या स्मारकाच्या निर्मितीच्या काळातच अनेकांना खरोखर आनंद झाला त्या स्मारकाच्या ठिकाणी लिहिलाताईंच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आठवणींना भीतीचित्रकाने उठाव आला लीलाताई व उत्तमराव पाटील यांच्या सैनिकी वेशातील अर्ध पुतळ्याने खरोखरच स्मारकाला जिवंतपणा आणला मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्या स्मारकाला कोणा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्याच्या उपस्थितीच्या निमित्ताने लोकार्पण काही होईना अनेक पत्रकारांनी या विषयाला वाचा देखील फोडले परंतु श्रेय वादामुळे लोकार्पणाचा सोहळा लांबत चालला होता आणि लीलाताई तसेच उत्तमराव पाटील यांचे गुरु साने गुरुजी यांच्यावर प्रेम करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांना ही गोष्ट सहन होईना म्हणून अशाच एका धडपडणाऱ्या साने गुरुजी विचाराच्या पुरोगामी कार्यकर्त्याने अर्थात संदीपराजे घोरपडे यांनी मनोमन निश्चय केला की स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींच्या स्मारकाला वाम मार्गाने निवडून आलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अथवा पालकमंत्री अजिबात पात्र ठरत नाहीत उद्घाटनासाठी जे पुरोगामी विचारांवर जगतात साने गुरुजींचा वैचारिक वारसा पुढे नेटाने चालवितात अशाच कार्यकर्त्यांनी अर्थात बहुजन समाजातील सामान्य नागरिकांनी एकत्र यावे व ह्या स्मारकाचे लोकार्पण करावे असे ठरविले त्याप्रमाणे अनेकांना आमंत्रित करून ज्याप्रमाणे इतिहासाच्या पानावर आमच्या बहुजन समाजाच्या नेत्यांना स्थान मिळाले नाही तो भूतकाळ आम्हाला माहित आहे मात्र आज वर्तमान काळात देखील लीला ताईंचे उत्तमराव नानांचे कार्य समाजातील तळागाळापर्यंत पोहोचू दिले जात नाही म्हणून स्मारकावर लावलेल्या कुलपावर हातोड्याचा घनाघात केला! ज्यांच्या अंगावर राज वस्त्र हवी होती त्यांना अत्यंत गलिच्छ अशा गोणपाटाने गुंडाळून ठेवलेले होते त्या गोंणपाटाला फाडून दोनही अर्ध पुतळ्यांनी आज मोकळा श्वास घेतला आणि सर्वांच्या साक्षीने नगरपालिकेचे कर भरणारे नागरिक स्वतःहून स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजर झाले.

जनतेसाठी स्मारक खुले केले यावेळी संदीपराजे घोरपडे यांनी सांगितले की इंग्रजांविरोधात लढताना आम्ही इंग्रजांचे गुलाम नाहीत आणि स्वतंत्र आहोत आमच्या देशात आमचे सरकार आहे त्या सरकारला प्रति सरकार नाव दिले त्या सरकारत चुकीचे वागणाऱ्याला शिक्षा दिली जाईल त्याला पत्री सरकार या नावाने देखील ओळख मिळाले याच नाना पाटलांच्या नेतृत्वात खानदेशातील चिमठाणा खजिनालुटी मध्ये खानदेशातील अनेक लोक सामील होते साने गुरुजींचे आदेशाने 1942 च्या लढ्यात आमच्या लीलाताईंनी रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, न्यायालय व कचेरी भस्म सात करून दोन चिमट्या राख इंग्रज सरकारच्या हाताला लागू दिली. त्या दिवशी इंग्रज सरकारच्या सैनिकाच्या हातातील बंदुकीलाही न घाबरता लीलाताईंनी 5000 लोकांचा मोर्चा काढून हा पराक्रम केला मात्र कुठेही इतिहासात याची नोंद नाही याची खंत आम्हाला होती आणि त्याकरिता आम्ही दिनांक 26 एप्रिल रोजी अमळनेर येथून डांगरी गावापर्यंत पदयात्रा काढून लिलाताईंच्या कार्याचा जागर करणार आहोत त्या अनुषंगाने स्मारकाला लोकार्पण करणे आम्हाला क्रमप्राप्त वाटले म्हणून आम्ही हे कार्य केले. यावेळी अमळनेर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, राष्ट्र सेवा दलाचे भागवत गुरुजी, शरद पाटील, अशोक बाविस्कर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीपराजे घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील. गोकुळ बागुल. गोकुळ पाटील. शालिग्राम पाटील. हिम्मतराव गुरुजी. अँड.अशोक बाविस्कर मोतीलाल जाधव. दीपक सोनवणे. रोहिदास गुरुजी आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments