राष्ट्रवादी एस पी च्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करून शब्द फिरवला.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे 'अनिल पाटील पुन्हा विधानसभेमध्ये दिसणार नाहीत.. 'हे विधान खरे ठरविण्यासाठी स्वतःला निष्ठावान समजणाऱ्या अनेक नेत्यांनी तिकिट मिळविण्यासाठी नव्हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नको ते प्रयत्न केले होते.
प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी अवघ्या सहा महिन्या पूर्वी स्टॅम्प पेपरवर आपणच खऱ्या निष्ठावान असल्याचे हमीपत्र लिहून मोठी बॅनरबाजी केली होती.
मॅडम, कुठे गेली ती निष्ठा? तो स्टॅम्प पेपर ? ते बॅनर? ते शब्द? असा प्रश्न जनता विचारत आहे.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणून स्टॅम्प पेपर वर लिहून जाहिरात करू नये हे आता इतरांनी शिकले पाहिजे. राज्यातील व अमळनेरातील अनेक नेत्यांनी स्वार्थ साधत शरद पवारांची साथ सोडली की अन्य काही कारण आहे, याबाबत मात्र तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र स्टॅम्प लिहून निष्ठा दाखवीणाऱ्या ताई जोरदार टीकेच्या धनी झाल्या आहेत हे नक्की!
शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही तालुक्यात आहे व खोटे स्टॅम्प मिळविणारे लोकांना हा वर्ग निश्चित धडा शिकवेल यात शँका नसल्याचे जाणकार सांगत आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments