संविधान आर्मी तर्फे अमळनेर येथे संविधान गौरव तिरंगा संकल्प मेळावा संपन्न!

मोठ्या संख्येने संविधान प्रेमींनी नोंदवला सहभाग!!
दिनांक 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी दादर रेल्वे स्टेशन सह व जळगाव  जिल्ह्यात अकरा रेल्वे स्टेशन कॅप्चर करून संविधान रक्षणासाठी रेल्वे रोको आंदोलन करणार असे संकल्प मेळाव्यात ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी सांगितले.
अमळनेर येथे आज दिनांक 13 जुलै 2025 रविवार या रोजी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविधता संघटनांच्या वतीने संयुक्तरित्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने यानिमित्त 'ऑल इंडिया संविधान आर्मी' तर्फे संविधान गौरव तिरंगा रॅली काढण्यात आली.  संविधान गौरव तिरंगा रॅली व संकल्प मेळावा साने गुरुजी विद्यालयाचे प्रांगणात पार पडला. 
सदर मेळाव्यामध्ये संविधान बचाव चळवळीचे प्रणेते, कामगार नेते जगन भाऊ सोनवणे यांनी घणाघाती भाषण केले. 
 या वेळी प्रमुख अतिथी प्रा. अशोक पवार यांनी मार्गदर्शन केले, यावेळी सर्व संविधानवादी, आरक्षणवादी, आंबेडकरवादी मान्यवरांचे क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी मेळाव्यात सहभागी झाले  होते.. अशी  माहिती ऑल इंडिया संविधान आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष  सुभाष आगळे यांनी दिली. या वेळी संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष  सुनंदाताई पान पाटील अमळनेर तसेच अमळनेर शहराध्यक्ष संविधान आर्मी अनिल रायसिंग व युवा तालुकाध्यक्ष (संविधान आर्मी) रवींद्र वानखेडे, संविधान आर्मी ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, संविधान आर्मी वकील आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट शिवकुमार ससाने इत्यादीं  केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड शिवकुमार ससाने (संविधान आर्मी वकील आघाडी अध्यक्ष) आदी उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,  स्वराज्य रक्षक  शिव छत्रपती यांना संविधानाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच यावेळी कामगार नेते जगन सोनवणे यांचा व भुसावळ नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य पुष्पाताई जगन सोनवणे यांना तिरंगा ध्वज व संविधानाची प्रत देऊन त्यांचा  सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
दादर येथे दिनांक १५ ऑगस्ट २५ स्वातंत्र्य दिन दिनी व जळगाव जिल्ह्यात 11 ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी अकरा रेल्वे स्टेशनवर विविध मागण्यांसाठी संविधान आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्या मागण्या पुढीलप्रमाणे
दादर चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे, सर्व च क्षेत्रातील रेल्वेचे  आणि फॅक्टरी तसेच वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण बंद करा, ईव्हीएम हटाव ,देश बचाओ , बॅलेट पेपर लाव,  जन सुरक्षा विधेयक नको आम्हाला, भुसावळ येथील संविधान भवन (भीमालय) ही जागा 99 वर्ष करारा वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा देखरेख समितीला देण्यात यावी, संविधान विरोधी देशद्रोही यांना फाशी शिक्षा द्या व संविधान विरोधी वक्तव्य व कृती करणे बंद करा, संविधान बचाव देश बचाओ, बेरोजगारांना रोजगार द्या या विविध मागण्यांसाठी  रेल रोको आंदोलन करण्याचे करण्याचा ठराव यावेळी ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे व विविध 10 संघटनांच्या वतीने संकल्प मेळाव्यात पारित करण्यात आला व आंदोलन रूपाने जाहीर करण्यात आला, संविधान रक्षा सैनिक  सुभाष  आगळे (ऑल इंडिया संविधान आर्मी जिल्हाध्यक्ष ) अमळनेर यांनी ठरावाचे वाचन केले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments