अमळनेर शहर व तालुक्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा गडखांब सरपंच नितीन खुशाल पाटील शहरातील बिल्डर तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार आदींचा समावेश आहे. जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.दरम्यान नितीन पाटील हे बाजार समितीचे माजी सभापती बापूराव खुशाल पाटील यांचे सुपुत्र असून प्रथमच बाजार समितीत संचालक म्हणून ते विजयी झाले आहेत. तसेच हेमंत पवार हे प्रसिद्ध बिल्डर असून सामाजिक व राजकीय कार्यात ते सक्रिय आहेत.
अजून अनेक मातब्बरांचे प्रवेश आगामी काळात होण्याचे संकेत मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणारे ठरणार आहे असे सूत्रांनी सांगितले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments