राज्यभरातील विविध पक्ष, आघाड्या व नेत्यांचा एकच ट्रेंड? साऱ्यांनाच हव्यात कटपुतली?
आगामी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्ष, आघाड्या 'सक्षम'(?) उमेदवार शोधत आहेत! एखाद दोन अपवाद असतीलही...
त्यांचे भाषेत सक्षम म्हणजे हुशार नको, बोलणारा नको, प्रश्न विचारनारा नको...
या बाबत आपल्याला अनुकूल असलेल्या उमेदवाराची 'जो-तो' 'ज्याच्या-त्याच्या' पद्धतीने चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे.
या चाचपणी मागे त्या उमेदवारांची निवडुन येण्याची क्षमता पाहिली जातेय असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. उमेदवारांची क्षमता म्हणजे त्याचे थोडे फार नाव झालेले असावे इतकेच! खरे तर....
●तो फक्त सह्याजीराव असावा.
●कानाखालचा असावा.
●सांगकाम्या असावा.
●शक्यतोवर 'मुका' असावा.
●आपण सांगू ते करणारा,
आपण सांगू ते बोलणारा,
आपण सांगू तेंव्हा बसणारा,
आपण सांगू तेंव्हा उठणारा.
हे 'गुण' असतील तर तो परीक्षा पास!
मग, बाकी आम्ही सांभाळून घेऊ.. सर्व ताकद लावून खर्च करून निवडून आणू!!
आहे का कुणी असा बगलबच्चा ?
त्वरित संपर्क साधा!
अशी परिस्थिती आज सर्वत्र दिसत आहे.
जे स्व कर्तृत्वावर, अक्कल हुशारीवर पद भोगू इच्छितात त्यांनी खुशाल अपक्ष उमेदवारी करावी.
तुम्ही शेवटपर्यंत त्यांच्या दारी चक्कर मारत राहावे, ते नक्की-नक्की म्हणून तुम्हाला खेळवून-खिळवून ठेवतील,.. पत्ता शेवटच्या क्षणाला ओपन करतील.. आणि ओपन झालेल्या या पत्त्यावर फोटो असेल आम्ही वर वर्णन केलेल्या 'पात्र' (सक्षम?) उमेदवाराचा!!!
-लोकहीतवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments