परिवर्तन पॅनलने दिली चुरशीची लढत!!
अमळनेर पंचक्रोशीत साहित्य चळवळ चालविणारी ख्यातनाम संस्था मराठी वाङ्मय मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणूकीत डॉ.अविनाश जोशी यांच्या अभिजात मराठी पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी शरद सोनवणे यांच्या परिवर्तन पॅनेलने देखील चांगली लढत दिली.
विजयी उमेदवार: अध्यक्ष-डॉ अविनाश जोशी (अभिजात), उपाध्यक्ष-डॉ. रवींद्र कुलकर्णी,(परिवर्तन) विवेकानंद भांडारकर (परिवर्तन), कार्यवाह-प्रा. शाम पवार (अभिजात), भैय्यासाहेब मगर (अभिजात), प्रदीप साळवी (परिवर्तन) हे विजयी झाले तर कोषाध्यक्षपदासाठी उदय देशपांडे (परिवर्तन) व प्रा. सुरेश माहेश्वरी (अभिजात) यांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढून त्यांनी दीड दीड वर्षे वाटून घेतली.
कार्यकारिणी सदस्यपदी- वसुंधरा लांडगे, डॉ महेश रमण पाटील, स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, प्रा. विजय तुंटे, संदीप घोरपडे हे अभिजात पॅनलचे सहा तर कांचन शाह, सोमनाथ ब्रमहें (परिवर्तन) विजयी झाले. तसेच ऍड.के व्ही ,कुलकर्णी व अनिल सोनार या परिवर्तनच्या दोघांना समान मते मिळाल्याने त्यांनी देखील ईश्वर चिठ्ठी द्वारे दीड-दीड वर्ष वाटून घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब देशमुख, विजय बोरसे, दिनेश नाईक यांनी काम पाहिले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments