अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या खर्च आपत्तीग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांचा जन्मदिवस दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी वृंद मोठ्या जल्लोष साजरा करतात. तसेच अशोक आधार पाटील व योगिता अशोक पाटील यांच्या विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी व आधार फाउंडेशन चे कार्यकर्ते यांचेसह अशोकभाऊ मित्र मंडळाचे पदाधिकारी हे विविध उपक्रम,कायक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असतात. यावर्षी मात्र अशोक पाटील यांच्या अर्धांगिनी असलेल्या आधार फाउंडेशनचे अध्यक्षा सौ.योगिता अशोक पाटील या उमेदवारी करू इच्छिणाऱ्या मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अमळनेर तालुक्यातही अनेक ठिकाणी कापूस, मका उत्पादक शेतकऱ्यांवर संकटसदृश्य परिस्थिती आहे.अशा परिस्थितीमध्ये सभापती अशोक पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे,खेडी, खर्दे या अतिवृष्टीमुळे अत्यंत नुकसान झालेल्या गावातील गरजवंत शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे जल्लोषाचे स्वरूप न देता माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवार व हितचिंतक कर्मचारी वृंद जे काही भेट वस्तू, पुष्पगुच्छ देऊ इच्छिता त्यांनी त्या ऐवजी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केल्यास माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्राला शोभणारा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान मला लाभेल असे सभापती अशोक पाटील यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments