जनतेचा निकाल स्वीकारून 'झालं गेलं गंगेला मिळालं' म्हणूया!

पराभुतांनी राग धरू नये व विजेत्यांनी उन्माद करू नये!! 
सर्वांचे लक्ष आजच्या निकालाकडे... निवडणूकीचा  माहोल विसरून चला विजय साजरा  करायला...! 
जो कुणी जिंकेल त्याचे मनापासून स्वागत करूया...!!
मित्रहो, न प निवडणूकीत सर्वांनीच शक्य ते प्रयत्न केले... राजकारणातील सर्व डावपेच/रणनीती वापरून झाले, खुन्नस दिली गेली, आरोप प्रत्यारोप झाले, आणि जणू रणांगणावर युद्ध व्हावे तसेच लढलो देखील..  
आता सर्वांचेच लक्ष आजच्या निकालकडे असणार हे स्वाभाविक आहे.. तसा निवडणुकीचा ज्वर उतरून काही काळ लोटला आहे... आता सर्व मिळून जनतेने काय कौल दिला ते शांत डोक्याने बघूया... 
जे जनता जनार्दनाने ठरविले असेल ते स्वच्छ मनाने स्वीकारूया.. ना जनतेवर, ना उमेदवारावर, ना कार्यकर्त्यांवर ना कुणी टीका केली, मदत केली नाही, भेटला नाही अशा कुणावर राग न धरता विजेत्याचे अभिनंदन करण्यातच खरी माणुसकी आहे. 
अशीच खिलाडू वृत्ती घेऊन आज 21 डिसेंबर 25 चा निकाल ऐकायला साजरा करायला जमुया.. 
जे विजयी होतील त्यांचे आताच अभिनंदन व जे यश मिळवू शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपण कुठे काय चुकलो त्याचा शोध घेत पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून शुभेच्छा..!
​"वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा।"
या न्यायाने
'झालं गेलं गंगेला मिळालं' 
म्हणत सारे पुन्हा एक दुसऱ्यात मिसळून जाऊ या. 
मित्रहो, निवडणुकीचा निकाल कोणाच्याही बाजूने लागू दे विजय पराजय कोणाचाही होऊ दे आपल्याला आयुष्यभर एकत्र रहायचे आहे... तरी विनंती की नैराश्याने वा विजयाच्या उन्मादात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
ज्यांना लोकहितवादी न्यूज हव्या असतील त्यांनी पुढील लिंकवर क्लिक करून लोकहितवादी परिवाराचे विनामूल्य सभासद व्हावे. 
https://whatsapp.com/channel/0029VbB85Q0Fy72FcComA20H
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक 
दै डेबूजी
79728 81440

Post a Comment

0 Comments