अमळनेर खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत आशिर्वाद विरुद्ध कुणीही नाही अशी स्थिती असताना शेवटच्या क्षणी माजी आमदार डॉ. बि.एस पाटील यांचे नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल तयार झाले.
परिवर्तनच्या सहा उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू करून भावनिक आवाहन देखील केले. भरतीत घोडे बाजार करणार नाही, पारदर्शक कारभार करू यासह गुणवत्ता वाढीचे त्यांचे अपील अनेकांनी मनावर घेतले आहे.
थोडक्यात परिवर्तन पॅनलने टक्कर निर्माण केली असली तरी आधीपासूनच सक्रिय झालेल्या आशिर्वाद पॅनलचा मात्र सर्वत्र बोलबाला दिसून येत आहे.
मतदारांचे पूर्ण ठावठिकाण, त्यांच्याशी वर्षोनुवर्षे जपलेले संबंध, सूत्रबद्ध प्रचार, पडेल तो खर्च करण्याची तयारी व एकत्रित प्रचार या कारणे आज तरी आशिर्वाद पॅनल चे पारडे जड मानले जात आहे.
तरीही त्यातील 2 उमेदवारांची घरवापसी निश्चित असून पंकज मुंदडे व डॉ अविनाश जोशी यांची एन्ट्री होणार असा दावा मतदारच करीत आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments