अमळनेर खाशी मंडळ निवडणुकीत परिवर्तनाचा धुव्वा! इतिहासात दुसऱ्या वेळी महिलेची एन्ट्री!!

प्रस्थापितांत पंकज मुंदडे व लीना पाटील हे दोन नवे चेहरे! 
अनेक दिग्गज लागले ढिमऱ्याला! 
भ्रष्ट, नोकरभरतीत घोडे बाजार, खाशी मंडळ बदनाम केले, संस्था दर्जा टिकऊ शकली नाही असे विविध आरोप परिवर्तन कडून करण्यात आले, माजी प्राचार्य डॉ एल ए पाटील यांनी तर थेट संचालकांचा गंभीर आजार, दारू सह अनेक विषय मांडून खालच्या पातळीवर टीका केली तरीही बजरंग अग्रवाल, कुंदनलाल अग्रवाल, विनोदभैय्या पाटील व आशिर्वादच्या नेतृत्वाने आपली टीम विजयी करण्यात यश मिळविले. 
प्रारंभी पासून सूत्रबद्ध प्रचार, लोकांशी ठेवलेले संबंध व मोठे अर्थकारण याचा आशीर्वादला झाला फायदा हे नक्की. 
काठावर उभे राहण्यापेक्षा प्रत्यक्ष पोहून पहायला हवे या न्यायाने परिवर्तन ने लढत दिली परंतु मतदारांनी त्यांना सफशेल नाकारले काहींना तर जेमतेम त्रिशतक देखील गाठता आले नाही. 
एकूणच बहुचर्चित खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत आशिर्वाद पॅनल च्या सहा लोकांनी दणदणीत विजय प्राप्त केला. 
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लालचंद सैनांनी यांचा 81 मतांनी निसटता पराभव झाला. 
उपाध्यक्ष पदी माधुरी पाटील व कमल कोचर तर विश्वस्त पदावर अपेक्षे प्रमाणे वसुंधरा लांडगे यांचा विजय झाला. 
अपक्ष पंकज मुंदडे सर्वाधिक मते घेऊन तर मनप्रितकौर कालरा यांचे नंतर लीना पाटील या इतिहासातील दुसऱ्या वेळी महिला संचालक म्हणून विजयी! अर्बन पाठोपाठ खाशित देखील दिवंगत गोविंदादादा मुंदडे व मृदू स्वभावी प्रकाशभाऊ मुंदडा यांचेसह मुंदडा परिवाराची जादू कायम असल्याचे सिद्ध! 
डॉ बि एस पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनच्या उमेदवारांना मतदारांनी सफशेल नाकारले!
मराठा समाजाच्या एकमेव उमेदवार लीना पाटील विजयी झाल्या डॉ अनिल शिंदे व कल्याण पाटील यांचा अगदी निसटता म्हणे 9 ते 10 मतांनी पराभव झाला.
जितेंद्र झाबक यांनी जोरदार लढत दिली तर नेहमी पत्रकबाजी करून लक्ष वेधणाऱ्या प्रसाद शर्मा यांना मतदारांनी जवळपास देखील उभे केले नसल्याचा प्रत्यय दिला.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments