रोज खा. शि. बद्दल काहितरी जाहीर करणे, पत्रकबाजी करणे नौटंकी वाटली का?

का झाला 'आशीर्वाद'चा विजय? पंकज मुंदडे व प्रवीण जैन यांची मते काय सांगतात?
मतदारांनी प्रसाद शर्मा यांना का सिरीयस घेतले नाही? वारसांचा मुद्दा, निवडणूक जाहीर करा, फोटोसह मतदार यादी जाहीर करा, नोकरभरती असे एक ना अनेक विषय घेऊन सतत तक्रारी, पत्रकबाजी, बातम्या करणाऱ्या प्रसाद शर्मा यांना या निवडणुकीत मतदारांनी जवळपास देखील उभे केले नाही. 
याची कारणे शोधण्यासाठी लोकहितवादीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या.. शर्मा यांच्या मागण्या योग्य नहोत्या का? त्यांना का नाकारले गेले असेल? आशीर्वादचा विजय का झाला? असे प्रश्न करून उत्तरे शोधली असता अनेकांनी सांगितले की, शर्मा यांनी मांडलेला विषय योग्य पण प्रपोगंडाच जास्त दिसत होता, अनेकांनी स्तुत्य मागणी व उत्तम पाठपुरावा असे ठासून सांगितले तर काहींनी ही नौटंकी असल्याचे शेरे मारले... सतत चर्चेत राहण्यासाठी ही चमकोगिरी करीत असावेत असा आरोपही एका जेष्ठ व खाशी परिवारातील मुरब्बी मतदाराने केला. शेवटच्या म्हणजे आठव्या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा निम्मे देखील मते शर्मा यांना मिळाली नाहीत, एके काळी चेअरमन असलेल्या दिलीप जैन यांची देखील तशीच गत झाली आहे. जनशक्ती जनशक्ती करता करता यांनी देखील शेवटच्या क्षणी 'प्रेमळ भेटी-गाठी' करीत आगेकूच करण्याचा प्रयत्न देखील केला हे लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही.  
या उलट ,परिवर्तनाच्याच प्रवीण जैन यांनी एक रुपया खर्च न करता लक्षणीय मते घेतली आहेत ते अपक्ष राहिले असते तर कदाचित आणखी वेगळा परिणाम आला असता असेंही लोकांनी मांडले.
खा शि व प्रेमळ पाकिटे हे समीकरण नेहमीच राहते त्यातही प्रवीण जैन व डॉ अविनाश जोशी यांना मिळालेली मते विचारात घेतली तर तुलनेने गेली अनेक वर्षे खा शि व्यवस्थापना विरुद्ध लढणाऱ्या शर्मा यांना लोकांनी जवळपास देखील उभे केले नसल्याचे दिसते. म्हणून त्यांचा  विषय योग्य अयोग्य या भानगडीत लोक पडलेच नाहीत.. ते त्यांच्या रोजच्या पत्रकबाजीला कंटाळले होते असे म्हणायला वाव आहे असा या प्रतिक्रियांचा अर्थ लावता येईल.
बहुसंख्य लोक पैशाला जागले असे म्हणायला वाव असला तरी अनेकांनी खरोखर माणसे पाहून मतदान केले असे प्रवीण जैन व डॉ जोशी यांची मते पाहून म्हणायला हरकत नाही. 
खानदेश शिक्षण मंडळाचा अध्यक्ष निवडून येत नाही हा इतिहास या वेळी देखील अधोरेखित झाला.. पण जितेंद्र झाबक यांनी चांगली लढत दिली हे मान्य करावे लागेल. अपक्ष पंकज मुंदडे विक्रमी मतांनी विजयी झाले यात फक्त  अर्थकारण असेल हे कुणालाही पटणारे नाही.. 
दुसरे म्हणजे राजकारणात नुसत्या बोंबा मारून चालत नाही, मोठ्याने ओरडले म्हणजे आपले म्हणणे  लोकांना पटतेच हा भ्रम असल्याचा प्रत्यय संतोष पाटील यांना आला असेलच.. तळमळ योग्य पण मांडणी चुकीची असल्याने या चळवळ्या कार्यकर्त्याची दिशा मात्र भरकटली होती.. असो, निदान या निमित्ताने त्यांच्यात परिपक्वता येईल अशी आशा करायला हरकत नाही..
एकूणच हा फक्त धनशक्तीचाच विजय असे मानायला लोक तयार नाहीत, तर वर्षोनुवर्षे हे लोक संपर्कात राहतात, अनेकांचा सल्ला घेतात, सुखदुःखात धावून येतात, कोठेही भेटले तर प्रेमाने विचारपूस करतात व मतांसाठीच नव्हे तर एरवी देखील अडचणीत मदत करतात या सर्वांची गोळा बेरीज म्हणजे त्यांना मिळालेला विजय होय असे परखड विश्लेषण एका जेष्ठ  खाशी निवडणूक तज्ज्ञाने केले आहे. अर्थात निवडणूक पश्चात लोकांनी खाजगीत व्यक्त केलेली ही मते आहेत, ती खरी मानावी की नाही हा ज्याचा त्याचा निर्णय! आम्ही फक्त सर्वांसमोर आणली इतकेच!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440
ता. क.-ब्लॉग मध्ये प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.

Post a Comment

0 Comments