कष्ट, चिकाटी आणि देशसेवेच्या जिद्दीमुळे पातोंडा परिसरातील चार गुणवंत युवकांनी देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. मनीष कुंभार (नगाव) – SSC GD मार्फत Assam Rifles मध्ये निवड, विवेक रवींद्र पाटील (धुपी) – SSC GD मार्फत ITBP मध्ये निवड, प्रशांत वाडीले (पातोंडा) – CRPF मध्ये जवान पदावर निवड, करण पवार (पातोंडा) – BSF मध्ये जवान पदावर निवड.
या चारही सुपुत्रांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना आकर्षक बॅग तसेच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
खडतर प्रयत्न व अभ्यास तुमची निवड सार्थ करणार असून निष्ठावंत देश सेवक म्हणन तुम्ही नाव रोशन कराल, तुमचा आम्हाला अभिमान आहे असे विश्वास रिताताई बाविस्कर यांनी या वेळी सांगितले.
या प्रसंगी या भावी जवानांच्या सत्कारासाठी गावातील ग्रामस्थ मंडळी तसेच त्या जवानांचे आई-वडील देखील उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये कपिल पवार व विलाससर, तसेच
कार्यक्रमाच्या आयोजक जि प अमळगाव पातोंडा गटातील भावी उमेदवार रिताताई भूपेंद्र बाविस्कर यांनी गावातील मान्यवर वैशाली पवार, नितीन पारधी, अशोक पवार, भरत बिरारी, सोपान लोहार, सुनील पवार, प्रशांत पवार, अमित पवार सर, रमेश संदानशिव, संजय पवार, अनिल पवार, छाया वाडीले, मंगला भोई, आशा भोई, करण पवार, वडील अनिल पवार, प्रशांत वाडीले, संगीता राजेंद्र वडीले तसेच पातोंडा परिसर विकास मंचातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments