पणन संचालकांनी काल दिलेल्या स्थगिती आदेशा मुळे अमळनेर बाजार समिती कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभे झाले आहे.
भूमिपुत्र असलेले आ. अनिलदादा पाटील यांचे बाजार समितीवर एकहाती वर्चस्व आहे. सर्व पदाधिकारी त्यांचेच समर्थक व हस्तक आहेत.. त्यामुळे अनिलदादा यांचे नियंत्रण राहिले नाहीय की त्यांचे मूक संमतीने हे सर्व सुरू आहे? असा सवाल शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला आहे.
पणन संचालक संजय कदम यांनी नोकरभरती प्रक्रियेस मिळालेल्या या पूर्वीच्या अनुमतीस पुन्हा स्थगिती दिल्याने अमळनेर बाजार समितीच्या कारभारात असलेला सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
अमळनेर येथे सुसज्ज इमारती, शैक्षणिक सोयी सुविधा व आवश्यक ती सर्व यंत्रणा असतांना धुळे जिल्ह्यातील भोकर येथे परीक्षा का घेण्यात येणार होती? या मागील गौडबंगाल काय आहे? हा चर्चेचा विषय झाला आहे.
👉 सावधान अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परीक्षा व नोकर भरतीला शासनाकडून धोरण निश्चित होई पर्यंत राज्यातील बाजार समितीमधील परंपरागत नियुक्त्यानां मान्यता व नविन भरतीस परवानगी देवू नये असे शासनाने आदेश दिले आहेत, तरी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी याची दखल घ्यावी व परीक्षा शुल्क भरले असतील त्यांनी परीक्षा शुल्क परत मागून घ्यावे, भगवान के घर देर है अधेंर नही, खोटे काम करणाऱ्यांना चपराक आहे, खोटी काम करून गरीब व गरजू तरूणाना फसवणूक करून मिस गाइड केलं जात आहे, हे आजच्या जीआर मधून स्पष्ट होते. असे आवाहन अमळनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments