ट्रेसर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात रिक्त पदे भरण्याची मागणी; ‘अनुबंध’ स्मरणिकेचे प्रकाशन

ट्रेसर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात रिक्त पदे भरण्याची मागणी; ‘अनुबंध’ स्मरणिकेचे प्रकाशन
​परभणी : अनुरेखक (ट्रेसर्स) बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘ट्रेसर्स असोसिएशन कृषी खाते महाराष्ट्र राज्याचे’ १२ वे सुवर्ण महोत्सवी राज्यव्यापी अधिवेशन परभणी येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात अनुरेखकांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला आवाहन करण्यात आले, तसेच संघटनेच्या ‘अनुबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
​अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. रावसाहेब राऊत, निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी पंडितराव बरदाळे, जीनियस स्कूलचे प्राचार्य काशिनाथ सालमोठे, तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष व्यंकटेश हालिंगे उपस्थित होते.
​अध्यक्षीय भाषणात दौलतराव चव्हाण यांनी अनुरेखकांच्या कामातील अचूकता, सुबकता आणि नीटनेटकेपणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशासकीय कामकाजात अनुरेखकांची भूमिका महत्त्वाची असून शासनाने या संवर्गातील रिक्त जागांचा अनुशेष लवकरात लवकर भरून काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
​अधिवेशनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी दिवंगत मान्यवर व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे सरचिटणीस जयप्रकाश कामडी यांनी अधिवेशनाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्यात प्रकाश कडू संपादित ‘अनुबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, ‘अनुवैभव’ त्रैमासिकाच्या संपादनाबद्दल किशोर शास्त्रकार यांचाही गौरव करण्यात आला.
​विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये व्यंगचित्रकार दगडू वाघ, पदोन्नती मिळवून अधिकारी झालेले जिल्हा कोषागार अधिकारी अण्णाराव भुसने (लातूर) आणि एलआयसी क्षेत्रात ‘एमडीआरटी’ सदस्यत्व मिळवल्याबद्दल आय. एस. ठाकूर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
​कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर, विलास पोवार, नंदकुमार परांडकर, हिरालाल बंडे, आर. आर. बनपुरे यांच्यासह लातूर विभाग आणि परभणी जिल्हा कार्यकारिणीने अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशी माहिती उपाध्यक्ष यशवंत जडे यांनी दिली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments